Excel · मराठी आवृत्ती
6.2 Structured references — formula मध्ये columnचं नाव वापरा
या page मध्ये
D2:D100 ऐवजी tblOrders[Amount] लिहिलं की आपण काय calculate करतोय ते लगेच समजतं. यालाच structured reference म्हणतात.
हे references कसे वाचायचे?
| Reference | अर्थ |
|---|---|
tblOrders[Amount] | Amount columnमधल्या data rows. |
[@Amount] | Tableच्या सध्याच्या rowमधली Amount. |
tblOrders[#Headers] | Header row. |
tblOrders[#Totals] | Total Row चालू असेल तर ती row. |
tblOrders[[#All],[Amount]] | Amountचा header, data आणि उपलब्ध total. |
tblOrders[[City]:[Area]] | Cityपासून Areaपर्यंतचे सलग columns. |
GST सहित Amount
आधी GST_Rate नावाचा cell define करा; 18% हवं असेल तर 18% किंवा 0.18 ठेवा, 18 नाही. Tableमध्ये Amount incl GST column बनवा. पहिल्या data cellमध्ये:
=[@Amount]*(1+GST_Rate)Enter केल्यावर formula पूर्ण calculated columnमध्ये भरतो. Tableबाहेर Pune sales:
=SUMIFS(tblOrders[Amount],tblOrders[City],"Pune")Formula बाजूला भरताना
Fill handleने formula उजवीकडे drag करताना structured column reference पुढच्या columnकडे जाऊ शकतो. साधं copy/paste आणि fill यांचं वर्तन सारखं समजू नका. Column fix करायचा असेल तर tblOrders[[Amount]:[Amount]] वापरा आणि result तपासा.
Practice
Lesson 4.9 मधली amount-band lookup वापरून Delivery Fee column जोडा. मग =[@Amount]+[@[Delivery Fee]] ने Net Amount करा. Nagpurमधल्या Blinkitची Amount total काढा:
=SUMIFS(tblOrders[Amount],tblOrders[Platform],"Blinkit",tblOrders[City],"Nagpur")