Excel · मराठी आवृत्ती
6.3 Total Row — filterनुसार बदलणारा total
या page मध्ये
Tableच्या शेवटी total दाखवायचा आणि filter बदलला की तोही बदलायला हवा असेल, तर Total Row वापरा.
Steps
- Tableमध्ये click करा › Table Design › Table Style Options › Total Row. Windows shortcut: Ctrl + Shift + T.
- शेवटच्या rowमधल्या Amount cellवर click करा. Dropdownमधून Sum निवडा. इतर columnsसाठी Average, Count, Max, Min किंवा StdDev वापरता येतं.
- Amountसाठी Excel
=SUBTOTAL(109,[Amount])तयार करतो. 109 म्हणजे filtered-out आणि manually hidden rows वगळून Sum. - City = Pune filter करा. Total कमी होतो कारण आता फक्त visible rows मोजल्या जातात.
Worked example
Module 3 च्या mini datasetमध्ये सर्व rows दिसत असताना Amount ₹2,870, average Delivery Mins 12.8 आणि nonblank Order ID count 10 येतो. Pune filter केल्यावर Amount ₹544, average 11 minutes आणि count 4 येतो.
हे expected results याच mini datasetसाठी आहेत. Order ID प्रत्येक product rowवर repeat असेल, तर Count हा order-line count असेल; distinct orders नाही.
Practice
tblOrdersमध्ये Amount → Sum, Delivery Mins → Average आणि Order ID → Count लावा. प्रत्येक Platformचा filter लावून तीनही results लिहा. शेवटी filter clear करून पूर्ण total परत येतो का तपासा.