Power BI · मराठी आवृत्ती
8.5 Conditional Column
Code न लिहिता if–then–else logic बनवता येतं. Basket Size चं sample पाहू:
- Add Column › Conditional Column › नाव Basket Size.
- Amount < 199 तर Small.
- पुढचा clause Amount < 499 तर Medium.
- बाकी Large.
Text columns साठी begins with, contains, equals; numeric columns साठी greater / less than असे operators मिळतात. ABC123 dropdown वापरून value किंवा output मध्ये दुसरा column / parameterही निवडता येतो.
Amount हा line amount असेल तर result line-value band आहे. पूर्ण basket size म्हणायचं असेल तर आधी प्रत्येक order चा total तयार करा.