Excel · मराठी आवृत्ती
7.9 Report Connections, Refresh आणि Data Source
या page मध्ये
एक City slicer अनेक PivotTables बदलू शकतो, जर त्या compatible source/cache वापरत असतील. Dashboardमध्ये सर्व views एकाच selectionवर चालावेत यासाठी connections तपासा.
एक slicer, अनेक Pivots
- tblOrdersवर Sales by City आणि Order Lines by Category असे दोन Pivots बनवा. पहिला Pivot copy करून layout बदलल्यास shared cache राखणं सोपं पडतं.
- City slicer select करा › Report Connections किंवा right-click › Report Connections.
- दोन्ही Pivots tick करा › OK. Timelineलाही याच पद्धतीने जोडा.
- एक City select करून दोन्ही results बदलतात का पाहा.
Refresh
- एक Pivot: PivotTable Analyze › Refresh; Windows Alt + F5.
- सर्व connections/Pivots: Data › Refresh All; Windows Ctrl + Alt + F5.
- File उघडताना refresh: PivotTable Options › Data › Refresh data when opening the file.
- Source बदलण्यासाठी Change Data Sourceमध्ये tblOrders द्या.
- Widths बदलू नयेत: Options › Layout & Format › Autofit column widths on update untick करा.
Queryमधून data येत असेल तर query refresh पूर्ण झाली का पाहा आणि मग Pivotच्या figuresची पडताळणी करा. Refresh सुरू झालं म्हणजे सर्व downstream numbers तयार झाले असं लगेच मानू नका.
Connection listमध्ये Pivot दिसत नसेल तर
वेगळा cache/model/source वापरला असण्याची शक्यता आहे. Compatible existing Pivotची copy करून field layout बदला किंवा त्याच modelवर rebuild करा. फक्त दिसायला source values सारखे असणं पुरेसं नाही.
Practice
एक City slicer आणि timeline तीन Pivotsना जोडा. tblOrdersमध्ये नवीन rows घाला. Refresh Allनंतर प्रत्येक Pivotचा result तपासा. Refresh on open चालू करा आणि file पुन्हा उघडून पाहा.