Excel · मराठी आवृत्ती
4.2 Approximate VLOOKUP आणि column index ची अडचण
Approximate match — TRUE lookup value पेक्षा लहान किंवा बरोबर असलेली सर्वांत मोठी value शोधतो. पहिला column ascending sort असला पाहिजे. Slabs किंवा bands साठी वापरा; IDs साठी exact match वापरा.
Column number बदलला तर?
VLOOKUP मधला col_index_num हा आपण लिहिलेला number आहे. Stores मध्ये Area नंतर Pincode column घातला तर column 5 हा City Manager न राहता Pincode होईल. Formula error न दाखवता चुकीची माहिती देऊ शकतो.
| Column insert करण्याआधी | Column E मध्ये Pincode insert केल्यावर |
|---|---|
=VLOOKUP(G2,Stores!$A$2:$F$8,5,FALSE) → Amir |
same formula → 440010 (wrong!) |
हा problem कसा टाळायचा?
- Column number manually न मोजता header वर MATCH वापरा:
=VLOOKUP(G2,Stores!$A$2:$G$8,MATCH("City Manager",Stores!$A$1:$G$1,0),FALSE). - किंवा INDEX + MATCH / XLOOKUP वापरा. त्यात return column थेट select करता येतो.
VLOOKUP च्या आणखी मर्यादा: lookup column च्या डावीकडून value आणता येत नाही, पहिलाच match मिळतो, आणि table width पेक्षा मोठा column index दिला तर #REF! येतो.
Practice
City Manager आणणारा VLOOKUP लिहा. Stores मध्ये Pincode column insert करा आणि result बदला का पाहा. मग MATCH वापरून formula दुरुस्त करा.