Excel · मराठी आवृत्ती
4.1 VLOOKUP — exact match
एका table मधल्या ID वरून दुसऱ्या table मधली माहिती आणण्यासाठी lookup वापरतो.
=VLOOKUP(lookup_value, table_array, col_index_num, [range_lookup])- lookup_value: काय शोधायचं? उदाहरणार्थ order मधला Store ID.
- table_array: कुठल्या table मध्ये शोधायचं? Lookup value त्याच्या पहिल्या column मध्ये असली पाहिजे.
- col_index_num: त्या selected table मधला कितवा column परत हवा? पहिला column = 1.
- range_lookup: FALSE किंवा 0 म्हणजे exact match; TRUE किंवा argument न दिल्यास approximate.
Orders मध्ये City आणूया
- Orders मध्ये Store ID column G मध्ये आहे. रिकाम्या column मधला P2 select करा.
=VLOOKUP(G2,लिहा. Stores मध्ये A2:F8 select करून F4 ने lock करा:Stores!$A$2:$F$8.- City हा table मधला तिसरा column आहे.
,3,FALSE)लिहा आणि Enter. - Fill handle double-click करून formula खाली copy करा.
| Formula | Result |
|---|---|
=VLOOKUP("BLK-NSK-01",Stores!$A$2:$F$8,3,FALSE) |
Nashik |
=VLOOKUP("AMN-NGP-01",Stores!$A$2:$F$8,5,FALSE) |
Amir |
=VLOOKUP("BLK-PUN-09",Stores!$A$2:$F$8,3,FALSE) |
#N/A — master मध्ये नाही |
BLK-NSK-01 साठी City Nashik, AMN-NGP-01 साठी पाचव्या column मधला manager Amir. Master मध्ये नसलेल्या BLK-PUN-09 साठी #N/A येतो.
Practice
Area, City Manager आणि Manager Email तीन VLOOKUPs ने आणा. मुद्दाम unknown Store ID घालून #N/A पाहा.