Excel · मराठी आवृत्ती
2.4 Drop-down lists
Data Validation मधला Allow: List पर्याय म्हणजे drop-down. प्रत्येकजण city वेगवेगळ्या पद्धतीने लिहिण्याऐवजी ठरलेलं नाव select करतो. त्यामुळे spelling आणि trailing spaces मुळे होणाऱ्या वेगळ्या entries कमी होतात.
Table वर आधारित city list
- Lists नावाच्या sheet मध्ये A1 ला City header द्या आणि A2:A7 मध्ये शहरं लिहा.
- Range select करून Ctrl + T ने Table बनवा. Table Design › Properties › Table Name मध्ये
tblCityनाव द्या. - Formulas › Defined Names › Define Name मध्ये नाव
CityList; Refers to:=tblCity[City]. Table मध्ये नवीन city आली की हा named reference वाढतो. - Orders चा City column select करा › Data › Data Tools › Data Validation › Allow: List › Source:
=CityList. In-cell dropdown tick ठेवा › OK. - छोटी fixed list असेल तर
Delivered,Cancelled,Returnedथेट Source मध्ये देता येते. - Microsoft 365 मध्ये spill range साठी
=$H$2#वापरता येतं; Module 9 मध्ये हे पुढे पाहू.
Payment Mode example
Source मध्ये UPI,Card,Cash on Delivery,Wallet द्या. वापरणाऱ्याला चार पर्याय दिसतील. Drop-down मधून निवडल्यावर naming consistent राहील. Excel validation text matching ने capitalization सक्तीने दुरुस्त होत नाही; import किंवा pasted data सुद्धा check करा.
तुमची practice
City, Platform — Blinkit / Amazon Now, आणि Status साठी drop-downs बनवा. City Table मध्ये Satara जोडा. Validation बदलल्याशिवाय तो पर्याय दिसतोय का तपासा.