# 13.3 Evaluation context

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch13-dax-data-analysis-expressions/13-3-evaluation-context.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Formula कोणत्या data वर चालतो ती परिस्थिती म्हणजे context.

Row context

सध्याची row. Calculated columns आणि SUMX, AVERAGEX, FILTER सारख्या iterators मध्ये तो असतो. Gross Line Value = Amount + Discount मध्ये कोणत्या row ची values घ्यायची ते समजतं.

Row context स्वतः filter नाही. Calculated column मध्ये SUM(Orders[Amount]) लिहिलं तर अनेकदा प्रत्येक row वर grand total येईल.

Filter context

Visual axis / rows / columns, slicers, इतर visuals चे interactions, visual / page / report filters, RLS आणि CALCULATE मधले filters मिळून context तयार होतो.

City matrix मधल्या Pune cell साठी DarkStore[City] = Pune filter असतो. Total row मध्ये त्या cell चा City filter नसतो; बाकी page / slicer filters मात्र राहतात.

Context transition

Row context मध्ये CALCULATE current row ला filter context मध्ये बदलतो. Measure reference मुळे हे आपोआप होऊ शकतं.

-- Calculated column in the Customer table
Customer Lifetime Sales = [Total Sales]

Customer मधल्या या column ला संबंधित customer च्या sales मिळण्यासाठी Customer → Orders relationship योग्य असली पाहिजे.

रवींद्र बागले यांची tip

Measure फक्त card मध्ये test करू नका. City आणि Month असलेल्या table मध्ये ठेवा. सगळ्या rows वर एकच result असेल तर relationship, filter किंवा जाणूनबुजून filter removal तपासा.
