# 12.6 Numeric आणि date bins

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch12-data-hierarchies-and-groups/12-6-bin-groups-numeric-and-date-bins.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Bins म्हणजे समान रुंदीचे ranges. Distribution पाहण्यासाठी histogram बनवायला उपयोगी.

Orders[Delivery Time Mins] वर right-click › New group.

Group type Bin; min / max तपासा.

Size of bins =5 द्या. 0,5,10,15 ही range starts आहेत; 5 म्हणजे ≥5 आणि <10 minutes.

Clustered column chart मध्ये bins axis आणि Total Orders values ठेवा. प्रत्येक label हवा तर axis Categorical करा.

Amount साठी size100 bins करता येतात. Order-value distribution साठी आधी प्रत्येक order चा total हवा. Line Amount bins म्हणजे line-value distribution. Number of bins =10 निवडल्यास min / max वरून रुंदी ठरते; boundaries गोल numbers असतीलच असं नाही. Date साठी सात दिवसांचे binsही शक्य.

Practice

5-minute delivery bins आणि योग्य grain वर ₹100 value bins बनवा. दोन histograms आणि Platform slicer ने sample Blinkit / Amazon Now distributions पाहा.

रवींद्र बागले यांची tip

एक 500-minute outlier मोठी range तयार करू शकतो. तो चुकीचा आहे की खरा incident ते तपासा; flag करून appropriate range दाखवा. Data silently delete करू नका.
