# 11.1 Data modelling महत्त्वाचं का?

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch11-data-modelling/11-1-why-data-modelling-matters.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Data model म्हणजे tables, त्यांच्यातले relationships आणि त्यावरचे calculations. योग्य grain आणि relationships मुळे totals बरोबर, DAX साधा आणि reports जलद राहू शकतात.

एक मोठी flat table किंवा विचार न करता अनेक many-to-many relationships बनवल्या तर filters आणि totals समजणं कठीण होतं. प्रत्येक flat table चुकीची असते असं नाही, पण reusable business model साठी facts / dimensions चा विचार उपयोगी.

Interview मध्ये फक्त chart कसा बनवला हे नव्हे, तर model का तसा बनवला हे सांगता आलं पाहिजे.

रवींद्र बागले यांची tip

Visuals बनवण्याआधी fact चा grain आणि dimensions ठरवा. चुकीच्या model वर प्रत्येक measure मध्ये अपवाद लावण्यापेक्षा पाया दुरुस्त करणं सोपं.
