# 6.7 Query Dependencies

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch06-power-query-essentials/6-7-query-dependencies.html
Language: mr (Marathi with English technical terms)

मोठ्या project मध्ये source queries, staging, helper functions, parameters आणि final tables असतात. View › Query Dependencies मध्ये कोण कोणावर अवलंबून आहे ते diagram मध्ये दिसतं.

Power Query Editor › View › Query Dependencies उघडा.

Data sources, queries आणि loaded tables यांच्यातले connections पाहा.

Query select केल्यावर ती कोणावर अवलंबून आहे आणि तिच्यावर कोण अवलंबून आहे ते highlight होतं.

मोठ्या diagram साठी layout व zoom controls वापरा.

आपल्या example मध्ये Folder → Blinkit_Orders; AmazonNow_Orders.csv → AmazonNow_Orders; दोन्ही → Orders. Products.xlsx → Product, आणि FolderPath parameter folder source ला value देतो.

Queries pane मध्ये right-click › Move To Group › New Group वापरून Parameters, Staging, Dimensions, Facts, Functions असे groups बनवा. Italic दिसणाऱ्या queries चं Enable load बंद असतं; त्या काम करतात पण model मध्ये स्वतंत्र table होत नाहीत.

रवींद्र बागले यांची tip

Staging query वापरात नाही असं वाटून delete करू नका. आधी Query Dependencies पाहा; तिच्यावर अनेक final queries अवलंबून असू शकतात.
