# 6.6 Reference आणि Duplicate यात फरक

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch06-power-query-essentials/6-6-reference-vs-duplicate.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Queries pane मध्ये query वर right-click केल्यावर दोन पर्याय मिळतात:

Duplicate: सर्व steps ची independent copy बनते.

Reference: नवीन query चा source हा मूळ query चा result असतो. मूळ cleaning बदलली तर reference वरही परिणाम होतो.

उदाहरणार्थ मोठ्या flat orders file मधून DarkStore dimension बनवायची आहे. Cleaned query चा Reference घ्या, store columns ठेवा आणि योग्य key नुसार duplicates काढा.
छोटी practice
एक Duplicate आणि एक Reference बनवा. मूळ query मधला filter बदला. Reference मध्ये बदल दिसतो; Duplicate चे स्वतंत्र steps तसेच राहतात.

रवींद्र बागले यांची tip

दोन queries ना एकच cleaned base लागणार असेल तर Reference वापरा. नाहीतर cleaning मधली एकच चूक दोन्हीकडे वेगवेगळी दुरुस्त करावी लागते. पूर्ण स्वतंत्र copy हवी तेव्हाच Duplicate वापरा.
