# 6.11 Close & Apply आणि Enable load

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch06-power-query-essentials/6-11-close-and-apply-and-enable-load.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Home › Close & Apply queries evaluate करून load enabled असलेले results model मध्ये आणतं.

फक्त merge किंवा पुढच्या query साठी वापरलेल्या helper / staging query वर right-click करून Enable load बंद करा. ती dependent queries साठी evaluate होऊ शकते; पण model मध्ये स्वतंत्र table म्हणून दिसणार नाही.

Practice

Blinkit orders ची staging query बनवा.

तिचं Enable load बंद करा.

Reference घेऊन final Orders query तयार करा आणि load सुरू ठेवा.

View › Query Dependencies मध्ये संबंध तपासा. Close & Apply नंतर Data pane मध्ये final table आहे का पाहा.

Chapter recap

Power Query steps नोंदवतो, source cleaning result तयार करतो. Steps ना स्पष्ट नावं द्या, types तपासा आणि Reference / Duplicate योग्य निवडा. आता प्रत्यक्ष cleaning करूया.

रवींद्र बागले यांची tip

Helper queries load केल्याने model मोठा आणि Data pane गोंधळाचा होतो. न बदलणाऱ्या static lookup साठी Include in report refresh बंद करण्याचा पर्याय विचारपूर्वक वापरा; data बदलू शकत असेल तर refresh सुरूच ठेवा.
