# 6.1 Power Query म्हणजे काय?

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch06-power-query-essentials/6-1-what-is-power-query.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Power Query हा data तयार करण्याचा ETL engine आहे. Power BI सोबत Excel, Dataflows आणि Fabric मध्येही त्याचा वापर होतो. ETL म्हणजे data आणणं, बदलणं आणि पुढच्या वापरासाठी load करणं.

Mouse ने transformation केलं की त्याचा step M language मध्ये तयार होतो. Refresh वेळी हे steps नवीन data वर पुन्हा चालतात. त्यामुळे cleaning चा process एकदा तयार करायचा; प्रत्येक महिन्याला तेच काम पुन्हा manually करायचं नाही.

Home › Transform data मधून Editor उघडा.

रवींद्र बागले यांची tip

नेहमीचे Power Query transformations तुमची source Excel / CSV file बदलत नाहीत. ते तिच्यावरून result तयार करतात. त्यामुळे raw data जपून ठेवा आणि cleaning steps query मध्ये करा.
