# 3.1 Get Data window वापरूया

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch03-getting-data/3-1-the-get-data-window.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Home › Get data निवडा. छोट्या drop-down मध्ये नेहमी लागणारे sources दिसतात. More… वर click केलं की पूर्ण Get Data window उघडते. File, Database, Microsoft Fabric, Power Platform, Azure, Online Services आणि Other अशा categories मधून connector शोधता येतो. Search box वापरूनही नाव शोधू शकता.

Source निवडल्यानंतर tables किंवा sheets निवडा. Navigator मध्ये त्यांचा preview दिसतो. खाली दोन पर्याय असतात:

Load: data जसा आहे तसा model मध्ये आणतो.

Transform Data: Power Query Editor उघडतो. Load करण्याआधी data clean आणि तपासता येतो.

नवीन source असेल तर आधी Transform Data निवडणं उपयोगी. उदाहरणार्थ Price column मध्ये काही values text असतील, तर chart बनवण्याआधीच ती अडचण सापडते.

रवींद्र बागले यांची tip

Navigator मधून घाईने Load करण्याआधी data types, नको असलेले columns आणि रिकाम्या values तपासा. Transform Data मधून ही तयारी केल्यावर model नीट राहतो.
