# 1.3 Power BI चे मुख्य भाग

Source: https://ravindrabagale.com/mr/powerbi/ch01-introduction-to-business-intelligence-and-power/1-3-components-of-power-bi.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Power BI वापरताना Desktop, Service, Mobile अशी वेगवेगळी नावं दिसतात. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. आधी ही ओळख करून घेऊ.

 | भाग | कशासाठी वापरतात? | कोण वापरतं?

 | Power BI Desktop | Windows वर चालणारं मोफत application. data जोडणं, बदलणं, model तयार करणं आणि report बनवणं ही कामं इथे होतात. file .pbix किंवा Power BI Project म्हणून .pbip स्वरूपात ठेवता येते. | Report developers आणि analysts

 | Power BI Service | app.powerbi.com वरची cloud सेवा. Report publish करणं, share करणं, refresh ठरवणं, dashboards आणि apps तयार करणं यासाठी वापरतात. | Developers, व्यवसायातील users आणि administrators

 | Power BI Mobile | फोनवर किंवा इतर mobile उपकरणांवर reports आणि dashboards पाहण्यासाठी app. | Managers आणि व्यवसायातील users

 | Power BI Report Server | संस्थेच्या स्वतःच्या servers वर reports ठेवण्यासाठी portal. यासाठी Report Server ला अनुरूप असलेली Desktop ची खास आवृत्ती वापरतात. | data स्वतःच्या servers वर ठेवण्याची गरज असलेल्या संस्था

 | On-premises data gateway | कंपनीच्या network मधल्या संगणकावर बसवलेलं connectionचं software. Cloud Service ला स्थानिक SQL Server किंवा shared drive मधला data सुरक्षितपणे refresh किंवा query करता येतो. | Administrators आणि developers

आणखी काही नावं पुढे ऐकायला मिळतील: Power BI Report Builder — छपाईसाठी पानांमध्ये नीट मांडलेले paginated reports बनवण्यासाठी; Power BI Embedded — स्वतःच्या app मध्ये reports दाखवण्यासाठी; आणि AppSource — अतिरिक्त custom visuals मिळवण्यासाठी.

कामाचा क्रम: Excel / CSV / SQL / Web मधला data → Desktop मध्ये Power Query, Model, DAX आणि Report → Service वर Publish → Workspaces, Refresh आणि Apps → Browser, Mobile किंवा Teams मधून report पाहणं.

सुरुवातीसाठी एवढं लक्षात ठेवा: Desktop मध्ये report तयार करायचा; Service मधून तो इतरांना उपलब्ध करून द्यायचा. Gateway म्हणजे कंपनीतला data आणि cloud यांना जोडणारा पूल समजा.

रवींद्र बागले यांची tip

Desktop आणि Service यांची गल्लत करू नका. या कोर्समध्ये report आणि model तयार करण्याचा सराव Desktop मध्ये करतो. Sharing, scheduled refresh आणि access permissions ही कामं Service मध्ये पाहतो. Desktop मध्ये file उघडी ठेवली म्हणजे Service मधला scheduled refresh आपोआप सुरू झाला असं होत नाही.
