Excel · मराठी आवृत्ती
16.3 Lookupsचा सराव
या page मध्ये
आधी स्वतः करून पाहा. अडल्यावर hint उघडा. Formulaचा result sampleच्या दोन-तीन rowsवर हाताने तपासा.
Exercise 1: Store IDवर City Manager शोधा.
Hint आणि तपासणी
=XLOOKUP(F2,tblStores[Store ID],tblStores[City Manager],"Not found")F2मध्ये Store ID असलेल्या worksheetसाठी. Module3 mini dataचा F म्हणजे Qty; तो इथे वापरू नका.
Exercise 2: तेच VLOOKUP आणि INDEX-MATCHने करा.
Hint आणि तपासणी
=VLOOKUP(F2,tblStores,5,FALSE)
=INDEX(tblStores[City Manager],MATCH(F2,tblStores[Store ID],0))VLOOKUPमध्ये Store ID पहिला आणि Manager पाचवा column असल्याची खात्री करा.
Exercise 3: Managerवरून Store ID परत मिळवा.
Hint आणि तपासणी
XLOOKUP/INDEX-MATCH left lookup करतात. एका Managerकडे अनेक Stores असतील तर पहिला match पुरेसा नाही; FILTERने सर्व matches दाखवा.
Exercise 4: ₹250 orderची slab fee?
Hint आणि तपासणी
=VLOOKUP(250,FeeSlabs,2,TRUE)0→30,99→25,199→15,499→0; ascending thresholds. Expected₹15.
Exercise 5: City Nashik, Month Mar-2026चा matrix lookup.
Hint आणि तपासणी
=INDEX(B2:M7,MATCH("Nashik",A2:A7,0),MATCH("Mar-2026",B1:M1,0))Headers text असतील तरच text lookup. Real-date headersसाठी DATE(2026,3,1) वापरा.
Exercise 6: Amazon Now IDsपैकी masterमध्ये नसलेले शोधा.
Hint आणि तपासणी
=IF(ISNA(MATCH(A2,Master[Order ID],0)),"Missing","")Key types/spaces आधी normalize करा. COUNTIF(...)=0 हा पर्याय.