# 9.6 LET — formulaच्या भागांना नाव द्या

Source: https://ravindrabagale.com/mr/excel/ch09-dynamic-arrays/9-6-let.html
Language: mr (Marathi with English technical terms)

=LET(name1,value1,[name2,value2,…],calculation)

Formulaमध्ये तोच SUMIFS दोनदा-तीनदा लिहिण्याऐवजी त्याचा result एका नावाने वापरता येतो. वाचायला आणि दुरुस्त करायला सोपं पडतं.

Repeated calculation

=IF(SUMIFS(tblMini[Amount],tblMini[City],M1)=0,"No sales",SUMIFS(tblMini[Amount],tblMini[City],M1)/COUNTIFS(tblMini[City],M1))

मूळ example sales = 0 असेल तर “No sales” म्हणतो. पण zero sales आणि zero orders हे वेगळे आहेत. खाली divisionपूर्वी denominator तपासू:

=LET(city,M1,
 sales,SUMIFS(tblMini[Amount],tblMini[City],city),
 cnt,COUNTIFS(tblMini[City],city),
 IF(cnt=0,"No orders",sales/cnt))

M1 Pune असेल तर 544 ÷ 4 = 136. प्रत्येक row एक order असलेल्या mini sampleमध्ये AOV ₹136. Product-line dataमध्ये हा average line amount असेल.

नावं formulaपुरती local आहेत. sales, cntसारखी अर्थपूर्ण नावं वापरा. A1सारखा cell reference किंवा R1C1शी conflict होणारी नावं टाळा. Formula barमध्ये line breaks केल्याने readability वाढते.

Practice

Delivery Fee logic LETमध्ये लिहा. AOVमध्ये GST_Rate नावाचा cell वापरून variable gst जोडा; valid count असल्यास sales/cnt*(1+gst). आधीच tax-inclusive salesवर पुन्हा tax जोडू नका; exampleची assumption लिहा.

रवींद्र बागले यांची tip

LETने calculationला नाव देता येतं; चुकीचा business logic आपोआप बरोबर होत नाही. Count zero, missing values आणि row grain तपासा.
