# 8.8 Waterfall आणि Funnel

Source: https://ravindrabagale.com/mr/excel/ch08-charts/8-8-waterfall-and-funnel.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Waterfall सुरुवातीच्या valueपासून वाढ/घट होत शेवटची value कशी आली ते दाखवतो. Funnel एका processच्या पुढच्या stagesमध्ये किती observations टिकतात ते दाखवतो.

काल्पनिक Pune sales bridge — ₹ lakh

 | Step
 | Value

 | Oct Sales
 | 5.0

 | New customers
 | +0.8

 | Diwali basket growth
 | +0.9

 | Cancellations
 | -0.4

 | Returns
 | -0.2

 | Nov Sales
 | 6.1

तपासणी: 5.0 + 0.8 + 0.9 − 0.4 − 0.2 = 6.1. हे teachingसाठी दिलेले drivers आहेत; प्रत्यक्ष reportमध्ये drivers overlap होऊ नयेत आणि reconciliation जुळलं पाहिजे.

Waterfall steps

Steps आणि values select करा › Insert › Waterfall. Ribbonमध्ये हा इतर specialised chartsच्या dropdownमध्ये असू शकतो.

Nov Salesचा एकच point select करा › right-click › Set as Total.

Oct Salesलाही Total करा. मधल्या values changes म्हणून राहू द्या.

Units, positive/negative colours आणि labels स्पष्ट करा.

Funnel

काल्पनिक journey: Visits 50,000 → Cart 12,000 → Checkout 8,500 → Delivered 7,900. Stage names आणि counts select › Insert › Funnel.

हे एकाच cohort आणि consistent counting unitचे counts असले पाहिजेत. Unique visitors आणि orders थेट मिसळल्यास conversion चुकीचं ठरू शकतं. प्रत्येक पुढच्या stageचा मागच्याशी संबंध तपासा.

Practice

Nashikचा previous-month ते current-month sales bridge चार स्पष्ट driversसह बनवा. Start + changes = end जुळवा. Order journeyचा funnel आणि प्रत्येक stageचा conversion % बाजूला लिहा.

रवींद्र बागले यांची tip

End barला Set as Total न केल्यास Excel त्यालाही आणखी एक वाढ समजतो. Chart पाहण्याआधी arithmetic तपासा.
