# 8.5 Combo chart आणि secondary axis

Source: https://ravindrabagale.com/mr/excel/ch08-charts/8-5-combo-chart-with-a-secondary-axis.html
Language: mr (Marathi with English technical terms)

एकाच periodच्या दोन measuresचे units किंवा scales वेगळे असतील तर columns + line combo उपयोगी पडू शकतो. दोन्ही axes स्पष्ट नसतील तर हा chart दिशाभूलही करू शकतो.

Steps

Month, Pune Sales आणि Orders (Pune) columns select करा. Non-adjacent columnsसाठी Ctrl-select किंवा शेजारी helper summary करा.

Insert › Combo Chart › Create Custom Combo Chart.

Pune Sales → Clustered Column. Orders → Line with Markers आणि Secondary Axis tick.

Axis Titles द्या: डावी “Sales (₹ lakh)”, उजवी “Orders”.

Line आणि तिच्या axisच्या labelsचा colour जुळवा; units फक्त colourवर अवलंबून ठेवू नका.

November sample

Sampleमध्ये November sales आणि orders दोन्ही जास्त आहेत. AOV वेगळं calculate करा: ₹6.1 lakh ÷ 18,400 ≈ ₹33.15. October ₹5 lakh ÷ 15,200 ≈ ₹32.89. हा teaching sampleचा छोटा फरक आहे; chartमधल्या lines किती उंच दिसतात यावरून AOV ठरत नाही.

Secondary-axis bounds बदलून दोन series जवळजवळ सारख्या दिसू शकतात. संबंध सिद्ध करण्यासाठी त्यावर अवलंबून राहू नका; दोन aligned chartsही चांगला पर्याय असतो.

Practice

Nagpur Sales columns आणि average Delivery Mins line असा सहा महिन्यांचा combo बनवा. Minutesची source values वेगळी तयार/पुरवलेली असली पाहिजेत; या chapterच्या sales tableमध्ये ती नाहीत. काल्पनिक values वापरल्यास label करा.

रवींद्र बागले यांची tip

दोन measuresपुरता combo ठेवा. दोन्ही axesवर नाव आणि unit द्या; chartची appearance बदलली म्हणून correlation वाढली असं नाही.
