Excel · मराठी आवृत्ती
8.15 OFFSET आणि INDEXने rolling chart
या page मध्ये
नवीन महिना आला की शेवटचे सहा monthsच दाखवायचे असतील तर named ranges उपयोगी पडतात. हा example header A1मध्ये आणि सलग monthly dates A2पासून आहेत असं गृहीत धरतो.
=OFFSET(reference,rows,cols,[height],[width])Steps
- ChartDataच्या A columnमध्ये months आणि Bमध्ये Pune Sales. मध्ये blanks किंवा खाली notes नसावेत. किमान सहा data rows हव्यात.
- Formulas › Name Manager › New. Name LastMonths; Refers to:
=OFFSET(ChartData!$A$1,COUNTA(ChartData!$A:$A)-6,0,6,1)Headerसह सात filled cells असतील तर offset 1: A2:A7 मिळतो. आठ filled cells असतील तर A3:A8 — latest six rows.
दुसरं name LastSales:
=OFFSET(LastMonths,0,1)- Chart › Select Data › Edit seriesमध्ये values:
='Blinkit_Maharashtra.xlsx'!LastSales. तुमच्या actual workbookचं नाव वापरा. - Category Axis Labelsमध्ये
='Blinkit_Maharashtra.xlsx'!LastMonths. - नवीन month row वाढवा; पहिला जुना month निघतो आणि latest येतो का पाहा.
INDEX पर्याय
OFFSET volatile आहे; अनेक changesवर recalculate होतो. Rangeचा nonvolatile पर्याय:
=INDEX(ChartData!$A:$A,COUNTA(ChartData!$A:$A)-5):INDEX(ChartData!$A:$A,COUNTA(ChartData!$A:$A))हा COUNTA logicही contiguous data आणि फक्त एक headerवर अवलंबून आहे. Formulaमुळे दिसायला रिकाम्या cellsमध्येही COUNTA count होऊ शकतो.
Practice
Nसाठी 3/6/12 dropdown द्या. Available months n असतील तर k = MIN(N,n) घ्या; height k आणि start offset n+1−k. Data zero असेल तर “data उपलब्ध नाही” message द्या. N=12 असून फक्त सहा months असतील तर negative range बनवू नका.