# 8.14 Dropdownने बदलणारा chart — INDEX / XLOOKUP

Source: https://ravindrabagale.com/mr/excel/ch08-charts/8-14-drop-down-driven-dynamic-chart-index-xlookup.html
Language: mr (Marathi with English technical terms)

वाचणारा City निवडेल आणि त्याच chartमध्ये त्या Cityची sales दिसेल. यासाठी छोटा helper range वापरू.

Steps

Dash!B1मध्ये Data Validation › Listने Pune,Nashik,Nagpur dropdown बनवा.

Dash!B3:G3मध्ये Jul–Dec month labels ठेवा.

B4मध्ये खालील INDEX formula द्या आणि G4पर्यंत copy करा.

=INDEX(ChartData!$B$2:$D$7,MATCH(B$3,ChartData!$A$2:$A$7,0),MATCH($B$1,ChartData!$B$1:$D$1,0))

पहिला MATCH monthची row शोधतो. दुसरा MATCH selected Cityचा column शोधतो. INDEX त्या दोन्हींच्या intersectionमधली value देतो.

XLOOKUP उपलब्ध असल्यास पर्याय:

=XLOOKUP(B$3,ChartData!$A$2:$A$7,XLOOKUP($B$1,ChartData!$B$1:$D$1,ChartData!$B$2:$D$7))

Titleसाठी B6मध्ये =B1&" – monthly sales (₹ lakh)".

B3:G4 select › Insert › Clustered Column.

Chart title select करा. Formula barमध्ये =Dash!$B$6 द्या.

Dropdown Nagpur करा; values आणि title दोन्ही बदलतात का पाहा.

Practice

दुसरा dropdown Sales/Ordersसाठी बनवा. प्रत्येक Cityचे Orders data वेगळं उपलब्ध करा; source sampleमध्ये फक्त Pune Orders आहेत. Helper range योग्य measure निवडेल असा lookup वाढवा. Titleमध्ये City, measure आणि unit बदलू द्या.

रवींद्र बागले यांची tip

मोठ्या source tableवर series बदलत बसण्यापेक्षा helper rangeवर chart बनवा. Selection बदलल्यावर titleही बदलला पाहिजे; नाहीतर योग्य आकड्यांना चुकीचं नाव लागेल.
