# 7.7 Pivot sorting, filters आणि Top N

Source: https://ravindrabagale.com/mr/excel/ch07-pivottables-and-pivotcharts/7-7-sorting-filtering-and-top-10.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Top products किंवा सर्वाधिक sales असलेले areas शोधण्यासाठी Pivotचे value filters वापरा.

Steps

Amount valueवर right-click › Sort › Largest to Smallest.

Manual क्रम हवा असल्यास item label drag करून योग्य जागी ठेवा.

Row Labels dropdown › Label Filters › Begins With › Na केल्यावर नावावर filter होतो.

Value Filters › Top 10 dialogमध्ये Top, 5, Items, by Sum of Amount निवडा. Dialogचं नाव Top 10 असलं तरी 3, 5 किंवा इतर N देता येतो.

Status Filters areaमध्ये drag करा आणि Delivered निवडा.

Clear करण्यासाठी PivotTable Analyze › Clear › Clear Filters.

Top 5 products

Product Rowsमध्ये, Sum of Amount Valuesमध्ये ठेवा. Top 5 filter आणि descending sort दोन्ही लावा. कोणतं product पहिलं येईल ते dataवर ठरतं; seasonal fruit आहे म्हणून तेच top असेल असं गृहीत धरू नका.

प्रत्येक Cityसाठी sheet

Cityला Filters areaमध्ये ठेवा. PivotTable Analyze › Options dropdown › Show Report Filter Pages निवडा आणि City field द्या. प्रत्येक itemसाठी वेगळी sheet तयार होते. Raw dataच्या स्वतंत्र copies बनतात असा अर्थ नाही.

Practice

Status = Delivered, Platform filterमध्ये एक Platform, Rows = Area आणि Values = Sum of Amount. Top 3 Area filter लावून descending sort करा. दुसऱ्या Platformसाठी पुन्हा पाहा. सर्व platforms एकत्र केलेल्या Top 3चा अर्थ प्रत्येक Platformचे स्वतंत्र Top 3 असा होत नाही.

रवींद्र बागले यांची tip

Top 5नंतरचा Grand Total साधारण filtered itemsचा असतो. त्याला All Sales म्हणू नका. पूर्ण salesसाठी वेगळा unfiltered KPI ठेवा; tiesमुळे resultमध्ये जास्त itemsही येऊ शकतात.
