# 7.1 पहिली PivotTable बनवूया

Source: https://ravindrabagale.com/mr/excel/ch07-pivottables-and-pivotcharts/7-1-creating-a-pivottable.html
Language: mr (Marathi with English technical terms)

हजारो order rowsमधून Cityनुसार sales काढायच्या आहेत? प्रत्येक Cityसाठी वेगळा formula लिहिण्याऐवजी PivotTableमध्ये fields निवडा. काही clicksमध्ये summary तयार होते.

Steps

Source tblOrders clean ठेवा: एक header row, प्रत्येक columnला नाव, merged cells नाहीत आणि प्रत्येक columnमध्ये योग्य data type.

Tableमध्ये click करा › Insert › PivotTable › From Table/Range. Versionनुसार menu थोडा वेगळा दिसू शकतो.

Table/Range = tblOrders आणि New Worksheet निवडा.

Distinct Count किंवा अनेक related tables हवे असतील आणि तुमच्या Excelमध्ये पर्याय उपलब्ध असेल तर Add this data to the Data Model tick करा. साध्या पहिल्या exampleसाठी आवश्यक नाही.

OK. उजवीकडे PivotTable Fields pane दिसेल.

City → Rows आणि Amount → Values drag करा. Valuesमध्ये Sum of Amount आहे का पाहा.

Module 3 mini datasetचा result

 | Row Labels
 | Sum of Amount

 | Kolhapur
 | 232

 | Nagpur
 | 240

 | Nashik
 | 360

 | Pune
 | 544

 | Sambhaji Nagar
 | 195

 | Solapur
 | 1,299

 | Grand Total
 | 2,870

Pivotच्या cellवर click केल्यावर PivotTable Analyze आणि Design tabs दिसतात. Insert › Recommended PivotTables वापरून ready layoutsही पाहता येतात; निवडलेला layout तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय का ते तपासा.

Practice

Sheetचं नाव Pivot_City ठेवा. Source Tableमध्ये पाच नवीन orders जोडा आणि Pivotवर right-click › Refresh करा. नवीन total आणि source SUM जुळवा.

रवींद्र बागले यांची tip

Fixed A1:I500 rangeऐवजी Table वापरा. Table नवीन rows घेईल; Pivotमध्ये त्या दाखवण्यासाठी refresh लागेल. रिकामे headers किंवा merged cells आधी दुरुस्त करा.
