# 6.6 Advanced Filter — AND / OR अटी एकत्र

Source: https://ravindrabagale.com/mr/excel/ch06-tables-sorting-and-filtering/6-6-advanced-filter.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Complex conditions sheetवर स्पष्ट लिहायच्या असतील किंवा result दुसरीकडे काढायचा असेल तर Advanced Filter उपयोगी पडतो. एका criteria rowमधल्या अटी = AND. वेगवेगळ्या rows = OR.

Criteria example

 | City
 | Amount
 | Status

 | Pune
 | >200
 | Delivered

 | Nashik
 | 
 | 

याचा अर्थ: (City Pune AND Amount > 200 AND Status Delivered) OR (City Nashik). Nashikच्या rowमध्ये बाकी cells रिकामे असल्यामुळे Nashikसाठी Amount/Statusची अट नाही.

Steps — ranges overlap होऊ देऊ नका

Source data A1:I11 असेल तर criteria त्याच rangeवर लिहू नका. उदाहरणार्थ K1:M3 मध्ये वरील headers आणि दोन criteria rows ठेवा.

Headers sourceशी अगदी match झाले पाहिजेत: City, Amount, Status.

Dataमध्ये click › Data › Sort & Filter › Advanced.

List range: $A$1:$I$11. Criteria range: $K$1:$M$3.

Copy to another location निवडा; Copy to: $O$1. निवडक columns हवे असतील तर तिथे आधी त्यांचे exact headers ठेवा.

Outputमध्ये duplicate records नको असतील तर Unique records only tick करा. OK.

Module 3 mini datasetमध्ये BLK-1002 आणि BLK-1010 या Nashik rows येतात. Puneचा ₹220 order BLK-1009 Cancelled असल्याने पहिली अट पूर्ण करत नाही.

हा extracted result snapshot आहे. Source बदलल्यावर Advanced Filter पुन्हा चालवा.

Practice

(Platform Blinkit AND Category Fruits) OR (Platform Amazon Now AND Amount ≥ ₹200) असा criteria block करा. Excel cellमध्ये अट >=200 अशी लिहा. नंतर Unique records only वापरून distinct City–Area pairs काढा.

रवींद्र बागले यांची tip

Criteria rangeमध्ये पूर्ण blank row चुकून घेतली तर ती कोणतीही अट नसलेली OR row होते; सगळा data येऊ शकतो. Headers आणि नेमक्या criteria rows एवढाच range घ्या.
