# 4.1 VLOOKUP — exact match

Source: https://ravindrabagale.com/mr/excel/ch04-lookup-functions/4-1-vlookup-with-exact-match.html
Language: mr (Marathi with English technical terms)

एका table मधल्या ID वरून दुसऱ्या table मधली माहिती आणण्यासाठी lookup वापरतो.

=VLOOKUP(lookup_value, table_array, col_index_num, [range_lookup])

lookup_value: काय शोधायचं? उदाहरणार्थ order मधला Store ID.

table_array: कुठल्या table मध्ये शोधायचं? Lookup value त्याच्या पहिल्या column मध्ये असली पाहिजे.

col_index_num: त्या selected table मधला कितवा column परत हवा? पहिला column = 1.

range_lookup: FALSE किंवा 0 म्हणजे exact match; TRUE किंवा argument न दिल्यास approximate.

Orders मध्ये City आणूया

Orders मध्ये Store ID column G मध्ये आहे. रिकाम्या column मधला P2 select करा.

=VLOOKUP(G2, लिहा. Stores मध्ये A2:F8 select करून F4 ने lock करा: Stores!$A$2:$F$8.

City हा table मधला तिसरा column आहे. ,3,FALSE) लिहा आणि Enter.

Fill handle double-click करून formula खाली copy करा.

 | Formula
 | Result

 | =VLOOKUP("BLK-NSK-01",Stores!$A$2:$F$8,3,FALSE)
 | Nashik

 | =VLOOKUP("AMN-NGP-01",Stores!$A$2:$F$8,5,FALSE)
 | Amir

 | =VLOOKUP("BLK-PUN-09",Stores!$A$2:$F$8,3,FALSE)
 | #N/A — master मध्ये नाही

BLK-NSK-01 साठी City Nashik, AMN-NGP-01 साठी पाचव्या column मधला manager Amir. Master मध्ये नसलेल्या BLK-PUN-09 साठी #N/A येतो.

Practice

Area, City Manager आणि Manager Email तीन VLOOKUPs ने आणा. मुद्दाम unknown Store ID घालून #N/A पाहा.

रवींद्र बागले यांची tip

ID साठी exact match हवा असेल तर शेवटचं FALSE किंवा 0 विसरू नका. न दिल्यास चुकीचा पण बरोबर वाटणारा answer येऊ शकतो. Lookup table range $ ने lock करा.
