# 3.17 Formula errors ओळखा आणि दुरुस्त करा

Source: https://ravindrabagale.com/mr/excel/ch03-formulas-and-functions/3-17-error-types-and-how-to-fix-them.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Error म्हणजे Excel ने नेमकी अडचण सांगितलेली असते. नाव वाचा, मग कारण शोधा.

#N/A: Lookup value सापडली नाही. Spaces, text/number mismatch आणि lookup range तपासा. खरोखर missing value असेल तर IFNA वापरा.

#VALUE!: Input चा type चुकीचा किंवा ranges वेगळ्या आकाराचे. Symbol असलेला text number म्हणून वापरला आहे का तपासा.

#REF!: Reference invalid. वापरलेला column delete झाला असेल किंवा VLOOKUP column index range बाहेर असेल. Undo किंवा formula दुरुस्त करा.

#DIV/0!: Zero किंवा blank denominator. =IF(F2=0,"",G2/F2) सारखी योग्य condition वापरा.

#NAME?: Function/name ओळखला नाही. SUMIFF सारखं spelling, text भोवती quotes किंवा Excel version तपासा.

#SPILL!: Dynamic array पसरायला जागा नाही. Blocking cells clear करा; spill formula Table च्या बाहेर ठेवा.

#NUM!: Invalid numeric calculation, उदा. =SQRT(-1). Inputs तपासा.

#NULL!: Range operator चुकला, उदा. =SUM(A1 A5). गरजेनुसार comma किंवा colon वापरा.

#CALC!: Calculation result बनत नाही, उदा. FILTER मध्ये match नाही आणि if_empty दिलेला नाही. तो argument द्या.

#####: बहुतेकदा column अरुंद किंवा negative date/time. Width वाढवा किंवा time calculation दुरुस्त करा.

कारण शोधण्याच्या steps

Error cell च्या warning icon मधून Show Calculation Steps किंवा Trace Error वापरा.

Formulas › Formula Auditing › Trace Precedents / Trace Dependents ने संबंधित cells कडे arrows पाहा. Remove Arrows ने काढा.

Error Checking ने sheet मधल्या errors मधून क्रमाने जा.

Watch Window मध्ये दुसऱ्या sheets मधले महत्त्वाचे cells पाहत राहता येतात.

Practice

वेगळ्या practice sheet वर सहा मुख्य errors जाणीवपूर्वक तयार करा. प्रत्येकाचं कारण आणि त्याची fix शेजारी लिहा. मूळ कामाच्या file वर हा प्रयोग करू नका.

Chapter recap

SUMIFS/COUNTIFS/AVERAGEIFS ने conditional calculations; text functions ने split, join आणि cleaning; date-time हे numbers; IF/IFS/SWITCH ने logic; IFNA ने missing lookups; SUMPRODUCT ने arrays. Error आला की आधी त्याचा अर्थ समजून घ्या.

रवींद्र बागले यांची tip

Error पाहताच पूर्ण formula पुन्हा लिहू नका. #N/A म्हणजे value missing; #REF! म्हणजे reference तुटला. Trace Precedents आणि Evaluate Formula ने नेमका problem शोधा.
