# 18.3 EDA आणि visualization प्रश्न

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch18-interview-questions-and-answers/18-3-eda-and-visualisation.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Q11. EDA म्हणजे काय?

Exploratory Data Analysis म्हणजे reporting किंवा modelling च्या आधी data ची पद्धतशीर तपासणी: shape, types, nulls, distributions, relationships आणि लिखित findings.

Q12. Correlation आणि causation?

Correlation संबंध मोजतो. एका column मुळे दुसरा बदलला हे त्यातून सिद्ध होत नाही. Festival demand मुळे GMV आणि delivery minutes दोन्ही बदलू शकतात.

Q13. Cities compare करायला कोणता chart?

Sorted bar chart; मोठी नावं असतील तर horizontal सोयीचा. Title मध्ये निष्कर्ष द्या.

Q14. matplotlib आणि seaborn?

matplotlib मध्ये figure/axes वर पूर्ण control मिळतो. seaborn tidy DataFrame वरून statistical आणि category charts पटकन करतो; तो matplotlib वरच काम करतो.

Q15. Manager ला analysis कसं दाखवता?

आधी मुख्य निष्कर्ष, मग आधार देणारे दोन charts, data quality ची एक मर्यादा आणि एक स्पष्ट decision ask. Notebook मधली प्रत्येक cell समजावून सांगण्याची गरज नाही.

रवींद्र बागले यांची tip

लहान sample मधला pattern मोठ्या population ला लागू आहे असा दावा करू नका. Scope आणि sample size सांगणं हेही चांगल्या उत्तराचा भाग आहे.
