# 5.2 head, info आणि dtypes ने data तपासा

Source: https://ravindrabagale.com/mr/datascience/ch05-pandas-dataframes-and-series/5-2-head-info-dtypes.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Jupyter मध्ये steps

मागच्या lesson मधला DataFrame code run करा.

df.head() — पहिल्या 5 rows; इथे फक्त 3 असल्यामुळे तिन्ही दिसतील.

df.shape — (3, 7) म्हणजे 3 rows, 7 columns.

df.info() — non-null counts आणि dtypes.

df.dtypes — फक्त column types.

df.describe() — qty आणि amount यांची numeric summary.

df["city"] किंवा df.city — एक Series.

या उदाहरणात amount आणि qty numeric integers आहेत. Text columns चा dtype pandas version नुसार object किंवा string दिसू शकतो. Cancelled row अजूनही आहे; filtering Chapter 6 मध्ये करू.

रवींद्र बागले यांची tip

Column च्या नावात space असेल तर df.city सारखी dot पद्धत चालणार नाही. df["order id"] अशी brackets ची सवय ठेवा किंवा नाव order_id असं करा.
