Data Science · मराठी आवृत्ती
1.4 या course मध्ये काय आणि कोणत्या क्रमाने शिकणार?
| Chapters | काय शिकणार? |
|---|---|
| 0–2 | Course कसा वाचायचा, roles आणि Jupyter setup |
| 3–4 | Python आणि NumPy चा पाया |
| 5–11 | pandas: select, group, join, clean, dates आणि reshape |
| 12–15 | EDA, matplotlib, seaborn आणि निष्कर्ष सांगण्याची पद्धत |
| 16 | सुरुवातीपासून शेवटपर्यंत Blinkit Maharashtra project — model नाही |
| 17–20 | Practice, interview प्रश्नोत्तरं, cheat sheet आणि glossary |
AI/ML, sklearn, deep learning आणि NLP हे विषय मुद्दाम या यादीत ठेवलेले नाहीत.
या chapter मधलं लक्षात ठेवूया
- Analytics मध्ये summaries वापरून काय झालं आणि का झालं हे समजून घेतो. या course मध्ये त्यासाठी Python वापरतो.
- Excel, Power BI आणि Jupyter यांचा उपयोग output च्या गरजेनुसार बदलतो.
- Sum किंवा count करण्याआधी प्रत्येक row चा grain समजून घ्या.
- या पहिल्या आवृत्तीत ML नाही. Clean → EDA → visualization → निष्कर्ष सांगणं यावर भर आहे.
आता Python, Jupyter आणि packages चा setup करूया.