# DNS basics: नावापासून IP पर्यंत, port 53

Source: https://ravindrabagale.com/mr/cyber/part-01/ch02-ports-and-protocols-ssh-http-https-ftp-sftp-and/2-6-dns-basics-port-53.html
Language: mr (Marathi with English technical terms)

आपण website उघडताना IP पाठ करत नाही; google.com सारखं नाव type करतो. त्या नावाचे records शोधण्याचं काम DNS करतं. म्हणून DNS ला internet ची phonebook असंही म्हणतात.

DNS lookup step by step

Browser आणि operating system cache तपासतात. System च्या name-resolution configuration नुसार hosts file सुद्धा वापरली जाऊ शकते.

उत्तर उपलब्ध नसेल तर recursive resolver ला विचारलं जातं. हा ISP चा resolver, 8.8.8.8/1.1.1.1 सारखा public resolver किंवा EC2 वर VPC resolver असू शकतो.

Resolver कडे माहिती नसेल तर root server कडून .com servers ची दिशा मिळते.

.com TLD server कडून example.com चे authoritative name servers कळतात—उदा. ns51.domaincontrol.com. Registrar कडे केलेली NS configuration इथे महत्त्वाची असते.

Authoritative server A 203.0.113.10 सारखा record आणि TTL देतो.

Resolver TTL इतका वेळ उत्तर cache करतो आणि client ला देतो. Browser त्या IP ला connect होतो; HTTP/1.1 request मध्ये Host: example.com पाठवतो.

Cache मध्ये योग्य माहिती असेल तर प्रत्येक वेळी सगळे servers विचारावे लागत नाहीत. पारंपरिक DNS साधारण UDP 53 वापरतो. मोठी/truncated उत्तरं आणि zone transfers सारख्या कामांसाठी TCP 53 सुद्धा वापरला जातो. Chapter 3 मध्ये पूर्ण website flow पाहू.

महत्त्वाचे DNS records

 | Record | कशासाठी? | Example

 | A | नाव → IPv4 | example.com → 203.0.113.10

 | AAAA | नाव → IPv6 | example.com → 2001:db8::10

 | CNAME | Alias → दुसरं नाव | www → example.com

 | MX | Mail servers | 10 mail.example.com

 | TXT | SPF, DKIM, verification यांसाठी text | "v=spf1 -all"

 | NS | Authoritative name servers | ns1.example.net

dig example.com +short
dig MX example.com +short
nslookup example.com

या commands ने A/इतर DNS उत्तरं, MX records आणि name lookup पाहता येतो.

Security मध्ये DNS का महत्त्वाचं?

DNS वरून subdomains शोधता येतात. DNS spoofing/cache poisoning मुळे चुकीच्या server कडे traffic वळू शकतो. DNS tunnelling चा data बाहेर पाठवण्यासाठी गैरवापर होऊ शकतो. Email protection साठी SPF, DKIM आणि DMARC records मदत करतात. Delete केलेल्या cloud resource कडे अजून point होणारा विसरलेला CNAME काही परिस्थितीत subdomain takeover चा धोका तयार करू शकतो.

Practice

dig example.com, dig NS example.com +short आणि dig +trace example.com चालवा. TTL value आणि authoritative name servers ओळखा.

Chapter recap

Port service endpoint ओळखायला मदत करतो. Well-known range 0–1023. 21, 22, 23, 25, 53, 80, 443, 3306 आणि 3389 लक्षात ठेवा.

SSH (22) encrypted remote access देतो. Private key सुरक्षित ठेवा आणि access trusted IPs पर्यंत मर्यादित करा.

HTTP (80) मध्ये methods, headers आणि status codes असतात; plain HTTP clear text आहे. HTTPS (443) TLS ने connection protect करतो.

Plain FTP credentials protect करत नाही; SFTP/SCP वापरा.

DNS (53) नावांचे records शोधतो. A, AAAA, CNAME, MX, TXT आणि NS हे महत्त्वाचे records आहेत.

आता ss -tlnp वापरून आपल्या machine वर कोणत्या services listen करत आहेत ते पाहा. पुढे OSI आणि TCP/IP models शिकू.

रवींद्र बागले यांची tip

DNS record बदलल्यावर लगेच नवीन उत्तर दिसेलच असं नाही. जुनं उत्तर TTL पर्यंत cache मध्ये असू शकतं. वारंवार record बदलण्याऐवजी dig @8.8.8.8 yourdomain.com +short ने तपासा आणि cache expiry साठी वेळ द्या.
