AWS · मराठी आवृत्ती
Linux basics मधल्या नेहमीच्या चुका
- /Home आणि Index.html सारखा चुकीचा case; Linux case-sensitive आहे.
- प्रत्येक permission error साठी chmod 777; owner किंवा SELinux label चा खरा problem झाकला जातो.
- usermod -G मध्ये -a विसरणं; जुने groups आणि sudo access जाऊ शकतात.
- सगळं sudo -i मधून करणं; files root-owned होऊन सामान्य user ला edit करता येत नाहीत.
- Amazon Linux वर apt किंवा Ubuntu वर yum; आधी /etc/os-release तपासा.
- vim मधून बाहेर पडायला terminal बंद करणं; Esc मग :q! वापरा.
- rm -rf मध्ये चुकीचा path; Recycle Bin नाही. आधी command नीट वाचा.