# OSI practice आणि labs

Source: https://ravindrabagale.com/mr/aws/ch02-the-osi-model-and-tcp-ip-model/practice-questions-and-lab-exercises.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Diagram हाताने काढा आणि labs terminal वर करा.

सात OSI layers लिहा. योग्य ठिकाणी एक protocol/standard आणि device उदाहरण द्या; प्रत्येक layer ला स्वतंत्र hardware device असेलच असं नाही.

Transport, Network आणि Data Link ची PDU नावं सांगा.

TCP/UDP compare करा. साध्या DNS query मध्ये UDP आणि SSH मध्ये TCP का उपयोगी?

OSI/TCP-IP mapping काढून चार फरक लिहा.

Switch, router, ALB आणि Security Group कोणत्या माहितीवर काम करतात?

https://www.amazon.in उघडल्यावर सामान्य प्रवास समजावा.

curl -v https://www.example.com -o /dev/null मध्ये IP, TCP, TLS, status शोधा.

dig www.google.com आणि traceroute 8.8.8.8 run करा; दिसलेले hops नोंदवा. काही routers reply देत नाहीत.

Quick revision

Physical bits; Data Link frames/MAC/switch; Network packets/IP/router; Transport TCP/UDP/ports; Session; Presentation encoding/TLS संदर्भ; Application HTTP/DNS/SSH.

TCP/IP: Network Access, Internet, Transport, Application.

Encapsulation खाली headers जोडतो; decapsulation वर काढतो.

TCP handshake/ordered reliable stream; UDP connectionless datagrams.

सामान्य website: DNS → TCP → TLS → HTTP → server/app/DB → response → render.

Layer नुसार विचार केला की troubleshooting सोपं होतं. आता Linux शिकूया.

रवींद्र बागले यांची tip

Command output पाठ करू नका. कोणता भाग कोणत्या step चा पुरावा आहे ते दाखवा.
