# Networking practice आणि labs

Source: https://ravindrabagale.com/mr/aws/ch01-networking-fundamentals/practice-questions-and-lab-exercises.html
Language: mr (Marathi with English technical terms)

Subnetting पेन-कागदावर आणि commands terminal वर करा. फक्त वाचून सराव होत नाही.

IP आणि port मधला फरक रोजच्या उदाहरणाने सांगा.

SSH, HTTP, HTTPS, MySQL, MongoDB आणि Flask development server चे default ports लिहा.

10.4.5.6, 172.20.1.1, 200.1.2.3, 230.0.0.5 यांचे historical class आणि default mask सांगा.

172.16.0.0/22 चे आठ समान subnets करा. नवीन prefix, block size आणि तिसऱ्या subnet ची range काढा.

2406:da1a:0000:0000:0e00:0000:0000:0010 छोटं लिहा. :: फक्त एकदा का?

10.10.10.10, 172.32.1.1, 192.168.100.1, 100.64.1.1, 8.8.8.8 पैकी RFC 1918 private कोणते? 100.64.1.1 चा special-use अर्थ वेगळा लिहा.

Linux वर ip addr, hostname -I, curl -s https://checkip.amazonaws.com run करा. IP वेगळे का दिसतात? Hint: NAT.

EC2 stop केल्यावर auto public IP आणि Elastic IP चं काय होतं?

Quick revision

IP = कोणता host; port = कोणती service; socket address = IP:port.

22 SSH, 80 HTTP, 443 HTTPS, 3306 MySQL, 27017 MongoDB, 3000 Node, 5000 Flask, 8080 alternate HTTP.

IPv4 = 32 bits, चार octets. Historical A/B/C/D/E; CIDR /n → 2^(32−n) total addresses; AWS साधारण 5 reserve करते.

IPv6 = 128 bits, आठ hex groups; leading zeros काढा आणि :: एकदाच वापरा.

RFC 1918: 10/8, 172.16/12, 192.168/16. Default VPC उदाहरण 172.31.0.0/16.

NAT/PAT अनेक private hosts ला public IP share करू देतो. IGW 1:1, NAT Gateway many:1.

Auto public IP stop/start ने बदलतो; Elastic IP स्थिर ठेवता येतो.

आता OSI model शिकूया.

रवींद्र बागले यांची tip

उत्तर बरोबर आलं तरी कारण सांगता येतंय का पाहा. Subnet चा total आणि usable count वेगळा लिहा.
