AWS · मराठी आवृत्ती
Networking मध्ये होणाऱ्या नेहमीच्या चुका
ही checklist एकदा वाचून ठेवा; AWS troubleshooting मध्ये वेळ वाचेल.
- IP आणि port एकच समजणं: SG मध्ये 80 allow केल्याने public IP मिळत नाही; public IP मुळे port उघडत नाही. दोन्ही आणि योग्य route/service लागतात.
- Test साठी सर्व ports 0.0.0.0/0 ला उघडून विसरणं: MySQL 3306/MongoDB 27017 internet ला उघडे ठेवू नका.
- 192.168.x.x किंवा 10.x.x.x internet वर direct वापरणं: RFC 1918 private IPs public internet वर route होत नाहीत.
- Stop/start नंतर IP बदलणं विसरणं: DNS किंवा WordPress URL जुन्या auto public IP वर राहू शकतो.
- IPv6 मध्ये दोनदा :: वापरणं:
2001::1::5invalid आहे; zeros ची संख्या अस्पष्ट होते. - सर्व addresses usable मोजणं: नेहमीच्या AWS /24 मध्ये 251, 256 किंवा 254 नाही.